Ad will apear here
Next
पिंपरी-चिंचवडमधील ‘जंगल बचाव’ देखावा सर्वांचे आकर्षण

पिंपरी-चिंचवड : सध्या घरोघरी गणपतीबाप्पाचे आगमन झाले असून, त्याच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सामाजिक संदेश देणाऱ्या घरगुती देखाव्यांचीही चर्चा आणि कौतुक होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरणप्रेमी प्रभाकर पवार यांनी केलेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा देखावाही चर्चेचा विषय ठरला आहे. 

प्रभाकर पवार
अॅमेझॉनच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीमुळे पर्यावरणाच्या होत असलेल्या अपरिमित नुकसानाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पवार यांनी या देखाव्यातून केला आहे. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने कागदांचा वापर करून जंगल, तिथे राहणारे प्राणी साकारले असून, पर्यावरण वाचवण्यासाठी जंगल वाचणे गरजेचे आहे, असा संदेश त्यातून दिला आहे. देखावा बघण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. 

या देखाव्यामागची भूमिका स्पष्ट करताना प्रभाकर पवार म्हणाले, ‘जगाचे फुफ्फुस असलेले अॅमेझॉनचे जंगल जळत असल्याच्या बातम्या आपण सध्या ऐकतो आहोत. अनेक देश ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे होणारे नुकसान कधीही भरून न येणारे आहे. आपल्या देशातही अनेकदा जंगलात, डोंगरावर वणवे लावण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे प्राण्यांचा अधिवास नष्ट होतो, निसर्गाचे चक्र असंतुलित होते. याचा परिणाम मानव जातीलाच भोगावा लागणार आहे. पुढच्या पिढ्यांना आपण काय देणार आहोत, याचा विचार करणे गरजेचे आहे. जंगल वाचवणे अत्यंत आवश्यक आहे. हाच संदेश देण्यासाठी कागदांपासून जंगलाचा देखावा तयार केला असून, गणपतीबाप्पाची मूर्तीही शाडू मातीची आहे. हा देखावा लोकांना आवडत आहे, हे बघून आनंद होत आहे.’


(प्रभाकर पवार यांनी केलेल्या पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या देखाव्याची झलक दाखविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZZCCE
Similar Posts
प्रदूषणविरहित गणपती विसर्जनासाठी ‘लायन्स क्लब्स’चा पुढाकार पुणे : ‘दहा दिवस आनंदाने आपल्या बाप्पाची सेवा केल्यानंतर त्याचे विसर्जन प्रदूषणविरहित व्हावे, यासाठी लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी दोन या संस्थेच्या वतीने पुढाकार घेतला आहे. पर्यावरणाची हानी आणि नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी गणपती विसर्जन काळात (दि. ११ व १२ सप्टेंबर २०१९) ‘प्रदूषण विरहित
शाळेतील मुले घडवताहेत शाडूच्या गणेशमूर्ती पुणे/पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रत्येक शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मूर्तीचीच प्राणप्रतिष्ठा घरी केली जावी, असे आवाहन पालिकेतर्फे पालकांना करण्यात येत आहे. यातून पर्यावरणपूरक
दगडूशेठ हलवाई गणपतीला यंदा कोणार्कच्या सूर्यमंदिराची सजावट पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२७व्या वर्षानिमित्त यंदा श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात आले आहे. गणेश चतुर्थीदिनी सोमवारी, दोन सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील प. पू. विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे
पुण्यात साने गुरुजी तरुण मंडळातर्फे राम मंदिराची ६० फूट उंच प्रतिकृती पुणे : पुण्यातील साने गुरुजीनगरमधील साने गुरुजी तरुण मंडळाने यंदा गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती १०० फूट लांब, ४० फूट रुंद आणि ६० फूट उंच आहे. दोन सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते मंडळाच्या गणपतीबाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language